24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home Top News गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेसचे चाक तुटले

गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेसचे चाक तुटले

0
26

नागपूर,दि.29(विशेष प्रतिनिधी) – गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेसला होणारा भीषण अपघात प्रवाशांच्या सतर्कतेमुळे टळला.गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेस नागपूरजवळील कलमेश्वर येथे आली असता या गाडीच्या एका डब्याखालून मोठा आवाज आला. सतर्क प्रवाशांनी डब्याखालून येणारा मोठा आवाज ऐकून याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. त्यानंतर तातडीने ही गाडी थांबवण्यात आली. तपासणी केली असता गाडीच्या एसी डब्याखालील चाकाला तडे जाऊन ते तुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या डब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्यात पाठवून गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली. नागपूर येथे या गाडीला नवा एसी डबा जोडून  ही गाडी पुढे रवाना करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.