38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राष्ट्रीय देश मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता आली तर 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी

मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता आली तर 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी

0
23

blank

मंदसौर (वृत्तसंस्था) ,दि.06- मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे. गेल्यावर्षी झालेल्या शेतकरी आंदोलनात मंदसौरमध्ये 6 शेतकऱ्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी राहुल गांधी आज मंदसौरमध्ये आले आहेत. आंदोलनात पोलिसांच्या गोळीबाराचे शिकार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आणि विचारपूस केली. त्यानंतर आयोजित सभेत राहुल यांनी मोदींकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याची टिका केली. ते म्हणाले, नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींना भेटतात आणि बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहे.

blank