25 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भंडाऱ्यात प्रवाशांची तारांबळ

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भंडाऱ्यात प्रवाशांची तारांबळ

0
32
पगार वाढीवरुन राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संप घोषित केला. या संपाचा प्रभाव भंडारा गोंदिंयामध्ये सकाळपासूनच पाहायला मिळत आहे. रात्रकालीन बसेस सकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, आगारातून बाहेर जाणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री अचानक संप पुकारल्यामुळे अनेक प्रवाशी भंडारा बस स्थानकामध्ये अडकून पडले आहेत.एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मंजूर नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशा धमक्या देण्यात आल्या असून आम्ही त्या खपवून घेणार नाहीत. तसेच नवीन कर्मचाऱ्यांना आणखी वेतन वाढ द्यावी आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तो पर्यंत हा संप असाच सुरू राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
blank