वर्तणुक नियम व शिस्तभंग केल्याने मनिष डोंगरेची वेतनवाढ थांबविली

0
16

गोंदिया,दि.०८ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित केलेल्या शिफारसीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी यांनी आरोग्य विभागातील परिचर मनिष तुकाराम डोंगरे यांची राज्य घटनेच्या कलम२८(१)व२८(३)चे भंग करीत कार्यालयात २६ एप्रिल २०१८ रोजी साईप्रकटदिन कार्यक्रमाचे आयोजन करुन वर्तणुकनियम व शिस्तभंग केल्याने एकवेतनवाढ थांबविण्याचा निर्णय २१ मे रोजी घेतला आहे.शासकीय कार्यालयात कुठलेही पुजाअर्चना करता येत नाही,धार्मिक उत्सव न घेण्याच्या सुचना असतानाही साई प्रकट दिनाचा कार्यक्रम घेतल्याने त्यांच्या वेतनवाढ थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.विशेष गेल्या १०-१५ वर्षापासून आरोग्य विभागात साई प्रकट दिन कार्यक्रम साजरा केला जातो.यापुर्वी गणेशोत्सव सुध्दा साजरा करण्यात आलेला आहे.तर जिल्हा परिषद व खासगी शाळामध्ये दर शुक्रवारला सरस्वतीपुजनाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.डोंगरे यांनी जर हा कार्यक्रम घेऊन राज्यघटनेचा भंग केला आहे.तर त्या शाळामध्ये दर शुक्रवारला सरस्वतीपुजनाचे कार्यक्रम घेणारे मुख्याध्यापक व शिक्षक हे यापासून कसे वेगळे अशा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्यघटनेचा नियनानुसार कुठल्याही शासकीय व अनुदानीत कार्यालय,शाळा व संस्थामध्ये धार्मिक उत्सव व पुजापाठ न घेण्याचे निर्देश असताना असे होत असेल तर डोंगरे सोबतच त्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख व शिक्षणाधिकारी ज्यांनी यावर कारवाई केलेली नाही त्यांच्यावर सुध्दा मुख्य कार्यकारी अधिकारी व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कधी कारवाईसाठी पुढाकार घेतात याकडे लक्ष लागले आहे.चर्चेनुसार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुकाअ आले तेव्हापासून कर्मचाèयांना अधिकच त्रास दिला जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.