33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता नक्षलवाद्यांनी केली निष्पाप आदिवासी तरुणाची हत्या

नक्षलवाद्यांनी केली निष्पाप आदिवासी तरुणाची हत्या

0
21

गडचिरोली,दि.८ ः-गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी पोलीस स्टेशनंतर्गत येणार्या सिनभट्टी येथील आदिवासी तरुण इसरु चैतु पोटावी (वय ३३) याची नक्षलवाद्यांनी छातीत गोळी झाडून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना  ७/७/२०१८ च्या रात्री ११ ते ११.३० वा सुमारास घडली. ४० ते ५० नक्षलवाद्यांनी इसरु पोटावी याच्या घरी येवून त्याला मारहाण करत सोबत घेऊन गेले.त्यावेळी इसरुचे वडील चैतु पोटावी,भाऊ बिजू,पत्नी जयवंती,मुले रमेश,आकाश,अक्षय यांनी नक्षलवाद्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही दमदाटी व मारहाण केली.काही वेळेनंतर इसरुचा मृतदेह गावाच्या बाहेरील रस्त्यावर गावकऱ्यांना आढळून आला.इसरु हा स्वस्त धान्य दुकान चालवत होता.त्याच्याकडे या दुकानातूनच रुपये १ लाख जमा झालेले होते.त्याने सदर रक्कम ही घरात ठेवलेली होती.नक्षलवाद्यांनी ही रक्कमही इसरुच्या घरातून चोरून नेली.काहीही कारण नसताना नक्षलवाद्यांनी निरपराध आदिवासी तरुणांची हत्या केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाली आहे.

blank