विद्युत खाबांवरुन पडून युवकाचा मृत्यू

0
13

अर्जुनी मोरगाव,दि.8ः तालुक्यातील चान्ना बाक्टी येथे विद्युत खांबावर चढून काम करीत असलेल्या 38 वर्षीय सुरेश माेडकू लांजेवार या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवाारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली.विद्युत खांबावरुन बल्प लावून खाली उतरत असताना त्याचा तोल गेल्याने खाली पडल्याने तो जखमी झाला.त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने अर्जुनीमोरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले दरम्यान उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. सदर युवक हा ट्रक्टरदुरुस्तीसह वेल्डींगचे काम करुन कुटुंबाचे भरणपोषणाचे काम करीत होता.