जांब/कांद्री वनविभागातील मजुरी प्रकरणातील चौकशी थंडबस्त्यात

0
17
मोहाडी(नितिन लिल्हारे),दि.८ :: भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जांब/कान्द्री वनपरिक्षेत्रामार्फत झाडे लावण्याकरिता एप्रिल- मे महिन्यात खोदण्यात आलेल्या खड्डयांची मजुरी मजुरांना पुर्णपणे न देता त्यात अधिकाऱयांनी मोठ्या प्रमाणात घोळ केल्याचे चौकशीमध्ये   निष्पन्न झाले. उपवनसंरक्षक विवेक वि. होशिंग भंडारा यांना देण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे सहाय्यक वनसरंक्षक पी.जी.कोडापे यांनी केलेल्या चौकशीत मजुरांना पैसे दिले गेले नसल्याचे समोर आले होते.मात्र याप्रकरणाची चौकशी करण्याचीच जबाबदारीच  वनपरिक्षेत्राधिकारी डी.पी. चकोले यांच्यावर सोपविण्यात आली,जेव्हा की मजूर वर्गाने त्यांच्यावरच आरोप केले होते. कान्द्री वनपरिक्षेत्रातील कामात घोळ झाल्याने कान्द्री येथील अधिकारी चौकशी कशी करणार अशा प्रश्न मजुरांसमोर उपस्थित झाला आहे.येथील अधिकारी दोषी अधिकाऱ्यां बरोबर करारनामा सुद्दा करू शकतात ?अशा चर्चांना वेग आले असून सदर प्रकरणाची चौकशीच थंडबस्त्यात गेल्याने मजुरांच्या मजुरीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
टांकला व सालई खुर्द या गावातील जंगलात वनविभागा मार्फत ३० हेक्टर जागेत ३३३३०/- एप्रिल – मे महिन्यात केलेल्या खोदकामाचे ६,७७५९८ /- इतके रुपये होतात. मजुरांनी दीड बाय दीड खड्डा खोदल्यानंतर मजुरांना प्रती खड्डा २० रुपया वर मिळणार होते. मात्र अर्धेच पैसे मिळाले.मजुरांनी भर उन्हाळ्यात एका दिवशी १८ खड्डयाचे खोदकाम केले. मात्र येथील अधिकार्यांनी त्यांना प्रति खड्डा पैसे न देता अर्धे पैसे त्यांच्या खात्यावर टाकले.जे मजूर कमी दिवस कामावर आले व जे मजूर अजिबात कामावर आले नाही अशा मजुरांच्या बँक खात्यावर जास्तीचे पैसे टाकण्यात आल्याचेही समोर आले.मजुरांनी वनपरिक्षेत्राधिकारी डी.पी. चकोले ,बिटरक्षक डी ए फटींग,वनरक्षक गंधारे यांना विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उतरे दिले.
वास्तविक वनपरिक्षेत्राधिकारी चकोले यांनी कामावर न आलेल्या मजुरांच्या खात्यावर पैसे टाकल्याने हा आर्थिक भष्ट्राचर होत असतानाही वनविभागाचे अधिकारी सखोल चौकशी करुन कारवाई करण्याएैवजी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत असल्याचे मजुरांचे म्हणने आहे.तर चौकशी अधिकारी चौकशी सुरु असल्याचे सांगून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसत आहे. मजुरांच्या घामाचा पैसा गहाळ करणार्यावर मंजूर वर्गाकडून कारवाईची मागणी होत आहे.त्याचप्रमाणे बिटरक्षक डी ए फटींग, वनरक्षक गंधारे यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक रोपवणाच्या कामात गैरव्यवहार केला असून त्यांना पाठिशी घालणारे डी.पी. चकोले वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर  योग्य कार्यवाही करण्यात यावी व दोषी अधिकाऱ्याना निलंबित करण्याची मागणी तक्रारकर्ते शंकर गराडे, संकपाल दमाहे, सरदू लिल्हारे, जगत लिल्हारे, रमेश आटराहे, दूरंगलाल लिल्हारे, राजकुमार अठराहे, सुशीला लिल्हारे, अंतकला दमाहे, भक्तप्रलाद मांढरे, व  मजुरांनी केली आहे.
सालई खुर्द व टाकला या ठिकाणी वनविभागा अंतर्गत रोपवन करीता खड्डे खोदण्यात आलेले होते मात्र मजुरांना त्याचा घामाचा पैसा पूर्णता न देता अधिकाऱ्यांनी पैशाची अफरातफर केलेली आहे अशा अधिकाऱ्यांची कसून चौकशी करून तात्काळ निलंबीत करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे युवा नेते डॉ पंकज सुभाषचंद्र कारेमोरे यांनीही केली आहे.