
मार्गदर्शकांच्या उपस्थितीत कार्यकारीणीची निवड
गोंदिया,दि.11: पवार, पोवार, भोयर पवार समाजाची सर्वोच्च संस्था राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन १४ व १५ जुलै २०१८ रोजी गोंदिया येथील पवार सांस्कृतीक भवन कन्हारटोली येथे आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय पवार महासभेच्या नेतृत्वात पवार प्रगतीशील मंच व श्री प्रगतीशील शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व गोंदिया पवार समाजाच्यावतीने या अधिवेशनासाठी जयय्त तयारी सुरु केली आहे.9 जुर्ले रोजी पुढील पाच वर्षासाठी समाजाची कार्यकारीणीची निवडही करण्यात आली आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार विजय रहांगडाले करणार असून मुख्य अतिथी म्हणून बालाघाट सिवनीचे बोधqसह भगत व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष डॉ.बी.एम. शरणागत, विशीष्ट अतिथी म्हणून देवसिंग ठाकुर, डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे, इंजि. टी.डी. बिसेन, आ.के.डी. देशमुख, आ.मधू भगत,माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, चुन्नीभाऊ ठाकुर, शिशुपाल पटले, लोचनलाल ठाकरे, ढालसिंग बिसेन,माजी आमदार टामलाल शहारे, ओमकारसिंह बिसेन, अशोक कडवे, मारोतराव खवसे,माजी आमदार खोमेश्वर रहांगडाले, हेमंत पटले,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, रेखा बिसेन, अनुसया बिसेन, मीना बिसेन आदी समाजाचे गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या निमित्ताने पवार स्मरणिकाही प्रकाशित केली जाणार आहे.राष्ट्रीय अधिवेशनात बदलत्या सामाजिक परिवेशनात सामाजिक कुरिती तसेच भविष्यातील वाटचाली संदर्भात दिशा निर्देशासोबतच शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या पवार समाजाला एकजुट करण्याच्या संदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तसेच या अधिवेशनात आगामी ५ वर्षासाठी राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या कार्यकारिणी मंडळाची घोषणा केली जाणार आहे. अधिवेशनाचे यशस्विरित्या आयोजन करण्यासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या अधिवेशनाला जिल्ह्यातील पवार समाज बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन गुलाबचंद बोपचे,कैलाशचंद्र हरिणखेडे,राजेश चव्हाण आदी समाजबांधव व गोंदिया युवा पवार मंच,प्रगतीशील शिक्षण संस्थेच्या पदाधिर्यांकानी केले आहे.





