38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News मी अल्पसंख्यांकविरोधी नाही – प्रवीण तोगडिया

मी अल्पसंख्यांकविरोधी नाही – प्रवीण तोगडिया

0
18

blank

वृत्तसंस्था
रुरकेला (ओडिशा) – मी अल्पसंख्यांक समुदायांच्या विरुद्ध नाही, मात्र हिंदू बंधूभगिनींच्या बाजूने मी बोलतच राहणार असल्याचे विश्‍व विश्‍व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आज (शुक्रवार) स्पष्ट केले आहे. ओडिशा सरकारने धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कंधमाल जिल्ह्याला भेट देण्यास तोगडिया यांना बंदी केली होती.

याबाबत बोलताना तोगडिया पुढे म्हणाले की, “मी अल्पसंख्यांकांच्याविरुद्ध नाही. मात्र मी हिंदू बंधूभगिनींच्या कल्याणाविषयी बोलणे सुरूच ठेवणार आहे. मात्र मी बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात येणाऱ्या मुस्लिमांच्याविरुद्ध आहे. मला याच विषयावर कंधमालमध्ये बोलायचे होते. जर नवीन पटनायक यांना लोकांचे कल्याण नको असेल, तर लोकच पुढील निर्णय घेतील. मात्र, मी हिंदूंच्या कल्याणाच्या गोष्टी करत राहील. हिंदू हे सर्वाधिक गरीब असून त्यांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा मिळायला हव्यात. प्रत्येक हिंदू शिकला पाहिजे, तसेच त्याला योग्य रितीने प्रशिक्षित केले पाहिजे. ज्यामुळे त्याला कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:च्या पायावर उभे राहता येईल. सर्व हिंदूंना अन्न मिळायला हवे. त्यासाठी रोख आणि मदतीच्या स्वरुपात आपण दररोज सहकार्य करायला हवे.‘ असेही तोगडिया पुढे म्हणाले. तसेच हिंदूंच्या सुरक्षेविषयी चिंता वाटस असल्याचेही त्यांनी सांगितले.

blank