काँग्रेसचं घोर अपयश असलेली मनरेगा ढोल पिटत सुर ठेवणार – मोदींनी उडवली खिल्ली

0
15

नवी दिल्ली, दि. २७ – रोजगार हमी देणारी मनरेगा मी बंद करणार अशी टीका विरोधक करतात असे सांगत नरेंद्र मोदींनी काळजी करू नका हे काँग्रेसचं ढळढळित अपयश आहे, त्यामुळं ही योजना बंद तर करणारच नाही उलट ढोल पिटून पिटून सुरू ठेवीन असं सांगत काँग्रेसची खिल्ली उडवली. लोकसभेमध्ये बजेटच्या अधिवेशनादरम्यान ते बोलत होते. स्वातंत्र्य मिळूनही खड्डे खोदायला लागणारी मनरेगा सुरू ठेवायला लागली हे काँग्रेसचं घोर अपयश असल्याचं सांगत मला राजकीय समज चांगली असल्याचं सांगत काँग्रेसचं हे घोर अपयश कायम जगासमोर ठेवू असे सांगितले. मनरेगा, काळा पैसा, भूमी अधिग्रहण कायदा अशा अनेक मुद्यांना स्पर्श करत मोदींनी विरोधकांवर टीका केली तसेच हे सरकार गरीबांचं आहे आणि त्यांच्यासाठीच काम करेल असं सांगितलं. मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:

– काळ्या पैशाच्या बाबतीत G-20 च्या व्यासपीठावर पण आम्ही हा विषय घेतलाय. आम्ही काळ्या पैशाच्या बाबतीत आम्ही सतत प्रयत्न करत राहणार आणि जे कुणी आहेत त्यांना समोर आणणारच असा विश्वास मोदींनी लोकसभेतील भाषणात दिला.
– काळ्या पैशाची चर्चा होते. जे लोक काळ्या पैशाचं नाव काढत नव्हते ते आज काळ्या पैशावर बोलतात ते व्हा बरं वाटतं. आम्ही सगळ्यांना बोलायला लावलं हे आमचं यश आहे.
– तीन वर्ष सरकारने काळ्या पैशासाठी SIT स्थापन केली नाही, आम्ही ते काम पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलं. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी काही होत नाही. पण भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर धोरणांच्या आधारावर यंत्रणा चालायला हवी. जर यंत्रणा चोक असेल तर अधिका-यांना भ्रष्टाचार करायला संधीच राहणार नाही.
– मी मनरेगा बंद करीन असा आरोप होतो, परंतु माझी राजकीय समज खूप चांगली आहे. मनरेगा हा काँग्रेसचा ६० वर्षांतला जिवंत पुरावा आहे. हा पुरावा मी मिटवणार नाही, ढोल वाजवून मी मनरेगा सुरू ठेवणार आणि लोकांना कळेल की ६० वर्ष झाली पण अजून खड्डे खोदायचं काम देणारी मनरेगा ही काँग्रेसची देण आहे असं सांगत मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडवली.
– भूमीग्रहण कायद्याचा प्रश्न असता तर काँग्रेस निवडणुका जिंकलं असतं. पण शेतक-यांना ते पसंत पडलं नाही.
– स्वच्छता हे काम माझं किंवा माझ्या सरकारचं नाही तर सगळ्या सव्वाशे कोटी जनतेचं आहे. कुठल्याही नावानं स्वच्छता करा परंतु ते करण महत्त्वाचं आहे.
– केवळ मतांसाठी काम केलंत तरी स्वच्छता अभियान महत्त्वाचं आहे आणि समाजसेवा म्हणून केलंत तर जेवढी मन:शांती मिळेल तेवढी कशानंच मिळणार नाही.
– अस्वच्छता ही आजची मुख्य समस्या आहे. त्यामुळे गरीबांना फायदा होईल, महिलांना सन्मान मिळेल, मुलींची शाळेतली उपस्थिती वाढेल.
– योजना कुणी आणली तिचं नाव काय हा मुद्दा नाही, तर समस्या आहे हे सगळ्यांना मान्य आहे आणि समस्या कशी सोडवायची हा मुद्दा आहे.
– आम्ही यंत्रणा ठीक करण्यावर आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचं भलं करण्याचा विचार करत आहोत.
– सुप्रिया सुळेंनी स्वच्छता अभियानाचा विषय हातात घेतल्याबद्दल त्यांचं कौतुक आहे.
– कागदपत्रांना अटेस्ट करायला लागायचं, त्यांच्यावर हा अविश्वास दाखवणं आम्ही बंद केलं आणि सेल्फ अटेस्टेशन लागू केलं.
– मी विदेशी जातो त्याच्यावर टीका होते, परंतु मी तिथे का गेलो, कुणाला भेटलो याची पण चौकशी करा.
– जपानमध्ये मी नोबेल पारितोषिक विजेत्याला भेटलो की आदिवासींच्या सिकल सेल विकारावर उपचार आहे का हे बघण्यासाठी.
– मी ऑस्ट्रेलियात मी गेलो तिथे मी संशोधकांना भेटलो ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे जे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन व जास्त सकस उत्पादन करायचं तंत्रज्ञान समजण्याचा प्रयत्न केला.
– केळं हे गरीबांचं फळ आहे, गरीबांना त्यातून जास्त ताकद कशी मिळेल यावर संशोधन आहे आणि जगात जे काही चांगलं आहे ते आपल्या देशातील शेतक-यांना, आदिवासींना उपयोगाला येईल का याचाच विचार करण्यासाठी मी विदेशात जातो.
– योजनांच्या नावाबाबत टीका झाली परंतु, मुद्दा योजनेचं नाव किंवा योजना नवी हा नसून मुद्दा समस्या हा आहे
– या समस्या वारशाने आली असून त्यावर मार्ग काढला पाहिजे, जर समस्या दोन्ही बाजुंना मंजूर असेल तर चांगली गोष्ट आहे. आपण ती निपटण्याचा प्रयत्न करुया नाव काहीही असूदे.
– शाळांमध्ये ४.२५ लाख प्रसाधनगृहाची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत ६० ते ६५ हजार प्रसाधनगृहे बांधून झाली आहेत. येणा-या सुटीच्या काळानंतर जेव्हा सुरू होईल त्यावेळी मुलींच्या शाळांमधील प्रसाधनगृहांचे काम झाले असेल असा विश्वास आहे.
– सबका साथ सबका विकास हेच आमचं ध्येय आहे असं सांगत काँग्रेससह विरोधकांनी आम्हाला साथ द्यावा असं आवाहन केलं.
– माझ्या सरकारचा एकचं धर्म आहे आहे भारत, धर्मग्रंथ एकच आहे घटना, पूजा करायची सव्वाशे कोटी भारतीयांची हे आमचं तत्व आहे.
– विविधतमे एकता ही भारताची ताकद आहे. सभी संप्रदायाचं फळणं व फुलणं ही बारताची विशेषता आहे. भारताची घटना सर्वसामान्य माणसाचं प्रतिबिंब आहे. संप्रदायाच्या नावाखाली कायदा हातात कुणी गेऊ नये.
– हिंदूंना व मुसलमानांना मी विचारतो की तुम्हाला एकमेकांशी लढायचं आहे की गरीबीशी असा प्रश्न मी वाचिरत आहे.
– सांप्रदायिकतेवरून देशात खूप काळापासून गढूळ वातावरण आहे आणि मला प्रश्न विचारले जात आहेत यावर मी आज काही बोलणार आहे.
– आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथम असं होईल की राज्यांची संपत्ती केंद्राच्या संपत्तीपेक्षा जास्त असेल. राज्यांना सशक्त केलं तर भारत सशक्त होईल अशी आमची धारणा आहे.
– नैसर्गिक संपत्तीतून मिळणारं उत्पन्न राज्यांना मिळणार, पण तरीही आम्ही कोल ऑक्शन केला. अनेक राज्यांना इतका महसूल मिळणार आहे की त्यांच्याकडे तिजो-या कमी आहेत.
– देशाचा पूर्व भाग अप्रगत असून त्याचा विकास पश्चिम भारताप्रमाणं व्हायला हवा असा माझा प्रयत्न आहे.
– भूमी अधिग्रहण कायदा काँग्रेसच्या बरोबर आम्ही आणला. त्यात काही सुधारणा करणं हाच आमचा हेतू आहे. राजनीती करणं हा आमचा उद्देश नाही.
– भूमी अधिग्रहण कायद्याच्या बाबतीत क्रेडिट घेण्याचा प्रयत्न नको करूया. शेतक-याच्या विरोधात काही कमी राहिली असेल तर दूर करूया. याचा राजनैतिक फायदा काँग्रेसने घ्यावा माझं काही म्हणणं नाही. पण देशाचं नुकसान करू नका.
– भूमी अधिग्रहण कायद्यात जर तुम्हाला कमतरता वाटत असेल तर मला सांगा मी बदल करायला तयार आहे. पण, शेतक-यांच्या नावाखाली खोटा विरोधा करू नका.