38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home क्रीडा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी जगमोहन दालमियांची बिनविरोध निवड

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी जगमोहन दालमियांची बिनविरोध निवड

0
19

blank

चेन्नई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी जगमोहन दालमिया यांची बिनविरोध निवड झाली आहे. पूर्व विभागाच्या सहाही संघटनांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे जगमोहन दालमियांची अध्यक्षपदी बिनविरोध वर्णी लागली आहे.

बोर्डाच्या नव्या कार्यकारिणीसाठी उद्या चेन्नईत निवडणूक होणार आहे. यंदा अध्यक्षपदाचे उमेदवार सुचवण्याचा अधिकार पूर्व विभागाच्या बंगाल, त्रिपुरा, आसाम, झारखंड, ओडिशा आणि नॅशनल क्रिकेट क्लब या सहा राज्य संघटनांकडे आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना या सहा संघटनांपैकी सूचक आणि अनुमोदक म्हणून किमान दोन संघटनांचा पाठिंबा दर्शवणं आवश्यक असतं. मात्र सहाही संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे दालमिया बिनविरोध निवडून आले आहेत.

blank