28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ भंडारा जि.प उपाध्यक्षांच्या मतदारसंघाची उद्या फेरमतमोजणी, कोर्टाचा दणका

भंडारा जि.प उपाध्यक्षांच्या मतदारसंघाची उद्या फेरमतमोजणी, कोर्टाचा दणका

0
40

भंडारा,दि.09ः- भंडारा जिल्हा परिषदेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकानंद उर्फ नंदू कुर्ज़ेकर यांनी फेरमतदान केल्याचे आरोप करीत काँग्रेसचे पराभूत उमेदवार गंगाधर जिभकाटे यांनी भंडारा जिल्हा न्यायालयात दाद मागितले होते.त्यावर भंडारा जिल्हा न्यायालयाने त्या निवडणुकीची फेरमतमोजणी करण्याचा निर्णय दिला.त्यानुसार उद्या 10 आॅगस्टला कोंढा जिल्हापरिषद क्षेत्राची फेरमतमोजणी पवनी तहसील कार्यालयात करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या फेरमतमोजणीच्या निकालाकडे जिल्हावासींयाचे लक्ष लागले आहे.