38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

0
16

blank

मुंबई, दि. 10 : माजी राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे यांच्या निधनाने सहकार क्षेत्रासह विदर्भाच्या विकासासाठी झटणारा नेता हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात,श्री. धोत्रे यांनी अकोला जिल्ह्यात सहकाराच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचे त्यांचे प्रयत्न निश्चितच मोलाचे होते. राज्याच्या विकासात समतोल असला पाहिजे आणि त्यासाठी मागास प्रदेशांकडे विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे ही त्यांची भूमिका आजही मार्गदर्शक आहे.  शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी झटणारा महत्त्वाचा नेता आपण गमावला आहे.

blank