34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूतीकडे लक्ष द्यावे

कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूतीकडे लक्ष द्यावे

0
17

blank

अर्जुनी मोरगाव,दि.11ः- येथील नगरपंचायत सभागृहात मंगळवारी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, यशवंत परशुरामकर, राकेश लंजे, भोजराम रहिले, किशोर तरोणे, भास्कर आत्राम, शिशुला हलमारे, सुधीर साधवानी, नाजुका कुंभरे, नामदेव डोंगरवार, बंडू भेंडारकर, सोमदास गणवीर, चित्रलेखा मिश्रा, युवक तालुकाध्यक्ष योगेश नाकाडे उपस्थित होते. .

याप्रसंगी शिवणकर यांनी, सध्या सत्ताधारी खूप मोठा गाजावाजा करीत आहेत. परंतु अंमलबजावणी शून्य आहे. रोजगार हमी अंतर्गत केलेल्या कामांचे, गुरांचे गोठे द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. डिझेल व पेट्रोल दर वाढत आहे, धानाचे भाव कमी होत असून खताचे भाव वाढतच असल्याची टीका केली. चंद्रिकापुरे यांनी, देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यात असून त्यांचे कार्य आज सर्वसामान्य गावागावात आठवत आहेत. त्यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात बूथ कमिट्या स्थापन करण्यासाठी गावातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. बैठकीला सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष दादा संग्रामे, युवक जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, उद्धव मेहेंदळे, शालिक हातझाडे, शहर अध्यक्ष मनोहर शहारे, तुकाराम मडावी, नरेंद्र रंगारी, माधुरी पिंपळकर, भाग्यश्री मोहतुरे, निशा मस्के, कविता ठवरे, सरिता नंदेश्वर, दीपक सोनवाने, अजय पाऊलझगडे, निपल बरैया, मिथुन मेश्राम, राहुल भोयर उपस्थित होते. .

blank