40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home गुन्हेवार्ता कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त

कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त

0
20

नागपूर ,दि.20ः- नागपूर ग्रामीण पोलीस विभागातर्गंत येत असलेल्या कामठी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार खबर्याकडून मिळालेल्या माहितीनुसार १८ अॉगस्टच्या दुपारी  कामठी रेल्वे स्टेशनजवळील एका पानटपरीजवळ एक २५ वर्षाचा इसम अमली पदार्थ घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर तपास सुरु करण्यात आले असता संशयीत  आरोपी गुलाम असकारी वल्द हैदर अली (२५) रा.मोमीनपुरा रायपुर मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले असता पोलीसांनी त्याचाजवळुन २३ ग्रॅम हिरोईन जप्त केले.ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‌१लाख ३९ हजार किंमत आहे.पोलीसांनी त्याचाजवळुन ५ हजारांचे २मोबाईल ,असा एकुण १लाख ४४हजार ८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला .नवीन कामठी पोलीसांनी आरोपीविरुद्ध कलम २१ (ब) एन.डी.पी.एस.अॅक्ट अन्वेय गुन्हा दाखल केला.परिमंडल ५चे पोलीस उपायुक्त हर्ष पोतदार , साहाय्यक पोलिस आयुक्त राजेश परदेशी,नवीन कामठी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बापुराव ढेरे, पोलिस उपनिरीक्षक अंबादास टोपले, पोलिस शिपाई सुरज भारती ,राजू टाकळीकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.