28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home मराठवाडा/खान्देश आज पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची महत्वाची आढावा बैठक.

आज पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची महत्वाची आढावा बैठक.

0
20
नांदेड,दि.23ःशेतकरी दीन व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या तयारी साठी कृषी परिषदेची महत्वाची नियोजन आढावा बैठक आज शुक्रवार दी 24 आॅगष्ट रोजी दुपारी बारा वाजता मीटिंग हॉल शासकीय विश्रामगृह नांदेड येथे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश सचिव प्रा.विवेक सुकने,संघटक चक्रधर पाटील देवसरकर,प्रदेश सल्लागार शंकर पवार,विनीत पाटील,संदीप पावडे,अविनाश पाटील वाघमारे,एकनाथ मोरे,ज्ञानेश्र्वर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
बैठकीत 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शेतकरी दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे.तरी बैठकीस सर्व जिल्हा कार्यकारणी,तालुका कार्यकारणी, पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती प्रशांत पाटील आबादार जिल्हाध्यक्ष,उत्तर रामदास पाटील माळेगावे,जिल्हाध्यक्ष,दक्षिण,परमेश्वर काळे,महानगराध्यक्ष,नांदेड व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद,नांदेड जिल्हाच्या वतीने करण्यात आले आहे.