29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home गुन्हेवार्ता कोळसा चोरला म्हणुन सुरक्षारक्षकाची तरूणांना अमानुष मारहाण

कोळसा चोरला म्हणुन सुरक्षारक्षकाची तरूणांना अमानुष मारहाण

0
26

चंद्रपूर,दि.27 – दोनवेळची चूल पेटावी म्हणून थोडासा कोळसा उचलणाऱ्या दोन मुलांना सुरक्षारक्षकाने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार चंद्रपुरात घडला आहे. हा सर्व प्रकार दुर्गापुर कोळसा खाणीच्या क्षेत्रीय व्यवस्थापक कार्यालयाजवळ घडला असून, हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.उघड़यावर पडलेला कोळसा नेण्यासाठी हे दोन युवक खाण परिसरात शिरले होते. मात्र, सुरक्षारक्षकाने त्यांना पकडून बेदम मारहाण केली. या अमानुष मारहणीचा  व्हिडिओ आता व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हजारो टन कोळशाची चोरी उघड़या डोळ्यांनी बघणाऱ्या या सुरक्षारक्षकांनी टोपलीभर कोळशासाठी अशी मारहाण करावी, हा प्रकारच संवेदनशून्यतेचा कळस गाठणारा आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच या सुरक्षारक्षकाला अटक करण्याची मागणी केली जात आहे.