27.9 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home गुन्हेवार्ता घराचे छत तोडतांना मजुराचा मृत्यू

घराचे छत तोडतांना मजुराचा मृत्यू

0
24

आमगाव,दि.०४(महेश मेश्राम)-येथील तुकडोजी चौकातील सौरभ अग्रवाल यांच्या जुन्या घराचे बांधकाम तोडण्याचे काम सुरु असताना घराचे छत कोसळल्याने मलब्याखाली येऊन एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास मंगळवारला घडली.मृत मजूराचे नाव अश्विन मेश्राम(रा.जवरी) असे आहे.तर एक मजूर जखमी झालेला आहे.या कामावर आनंद डोये,कमलेश शहारे,योगेश डोये,सचिन डोये व संतोष डोेये हे सुध्दा कामावर होते.