41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता पोलिस शिपायाची गोळी झाडून आत्महत्या

पोलिस शिपायाची गोळी झाडून आत्महत्या

0
24

नागपूर,दि.05 : गेल्या काही दिवसांपासून पत्नीसोबत सुरू असलेला वाद विकोपास गेल्याने पोलिस दलात शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्‍यात गोळी घालून आत्महत्या केली. ही थरारक घटना आज बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडली. विनोद भगवान घिवांदे (वय 29) असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस शिपायाचे नाव आहे.

विनोद घिवांदे (बक्‍कल क्र. 386) यांची नियुक्‍ती राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 13 येथे आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून विनोद यांची तैनाती सेशल प्रोटेक्‍शन युनिट (एसपीयू) येथे होती. ते आईवडील, पत्नीसह जयताळ्यातील रडके ले-आऊट येथे राहत होते. सख्ख्या मामाच्या मुलीसोबत विनोद यांनी लग्न केले होते.

गेल्या काही दिवसांपासून ते तणावात वावरत होते. आज दुपारी दोन वाजता ते आपल्या खोलीत झोपले होते. त्यांनी सर्व्हिस रिव्हाल्वरमधून डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या केली. अचानक खोलीतून पिस्तूलातून गोळी सुटल्याचा आवाज आला. त्यामुळे पत्नीने लगबगीने खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी पती विनोद रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्यापाठोपाठ आलेल्या आईने मोठ्याने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांची एकच गर्दी जमा झाली. एकाने एमआयडीसी पोलिसांनी फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी लगेच मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात रवाना केला. याप्रकरणी प्राथमिक माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

blank