28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Top News राम कदम यांची जीभ छाटा, आणि पाच लाख रुपये मिळवा

राम कदम यांची जीभ छाटा, आणि पाच लाख रुपये मिळवा

0
36

बुलडाणा,दि.06(विशेष प्रतिनिधी) – मुबंईतील घाटकोपरचे भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात मुलींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नसून एकीकडे या विधानाबाबत कदम  यांनी माफी मागितली असली तरी त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.राज्य महिला आयोगानेही त्याना नोटीस बजावलेली असतानाच माजी मंत्री सुबोध सावजी यांनी चिथावणीखोर वक्तव्य करताना राम कदम यांची जीभ छाटा आणि पाच लाख रुपये बक्षीस मिळवा, असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.
राम कदम यांची जीभ छाटा आणि पाच लाख रुपये बक्षीस मिळवा, असे विधान सावजी यांनी केल्याचे वृत्त मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने प्रसारित केले आहे. भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात मुलींना पळवून आणू, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. राज्यातील अनेक ठिकाणी महिला संघटनांकडून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच त्यांच्या पोस्टरला चपलांचा मार देण्यात आला. तर विरोधकांनीही या प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.