30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ तिरोड्यात आयटकचा मोदी हटाव देश बचाव आंदोलन

तिरोड्यात आयटकचा मोदी हटाव देश बचाव आंदोलन

0
20

तिरोडा,दि.07ःः ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस आयटक द्वारा आयोजित देशव्यापी मोदी हटाओ देश बचाओ संविधान बचाओ कामगार कर्मचारी बचाओ आंदोलनांतर्गत तिरोडा तहसिल कार्यालयासमोर 6 सप्टेंबरला काॅ्.हौसलाल रहागंडाले व रामंचद्र पाटील,मिलिंद गणवीर,शालू कुथे,शकुंतला फटिंग यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात अंगणवाडीसेविका,मदतनिस,आशावर्कर,बीडी कामगार आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंगणवाड़ी कर्मचारी यूनियनच्या करुणा गणवीर, शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियनचे टेकचंद चौधरी,जीवन कला वैद्य, बिरजूला तिडके यांनी यावेळी विचार व्यक्त केले. कर्मचारी आदींना 18000 मासिक वेतन,3000 पेंशन लागू करण्यात यावे. आरोग्य सेवेचा लाभ देण्यात यावे.पेट्रोल डीजल गैस केरोसिनचे दर कमी करण्यात यावे.कामगार विरोधी कायद्यावर आळा घालण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन हा आंदोलन करण्यात आला.आज 7 सप्टेंबरला अर्जुनी मोरगाव तहसिल कार्यालयासमोर तर उद्या 8 सप्टेंबरला जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्हाव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.