38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home मराठवाडा/खान्देश पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराच्या गॅसची दरवाढ तात्काळ मागे घ्या

पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराच्या गॅसची दरवाढ तात्काळ मागे घ्या

0
30

blank

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची मागणी
नांदेड ,दि. 10 -पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर, जीवनआवश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. महागाई वाढत असल्याच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात आज सर्वपक्षीय बंदची घोषणा करण्यात आली होती. बंदमध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद सक्रिय सहभागी होऊन केंद्र सरकारने त्वरित दरवाढ मागे घ्यावी या मागणीचे निवेदन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
मागील चार वर्षांपासून भाजप सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल व इतर जीवनाश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यास केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. याच्या विरोधात आज भारत बंदची हाक दिली होती. नांदेड जिल्ह्यात कृषी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला व त्यानंतर जिल्हाधिकारी यांना दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली.
यावेळी निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम पाटील, कृषी परिषद जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील आबादार, सदाशिव पाटील आरसुळे, सुनील पाटील, मंगेश गवळी, गजानन पाटील नागेलीकर, गोपू पाटील वाळकीकर, माधव भोस्कर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank