25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home गुन्हेवार्ता मारहाणीतील जखमी वृद्धाचा मृत्यू

मारहाणीतील जखमी वृद्धाचा मृत्यू

0
16

चिमूर,दि.11 – चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुदेव वार्ड येथील बापुराव नागोराव लोणारे वय 85 या वृद्धास शेजारीच राहणारे ओमप्रकाश तुकाराम लोणारे वय 36 व कैलास तुकाराम लोणारे या दोघा भावांनी मिळून जागेच्या वादावरून 3 सप्टेबंर रोजी  सांयकाळी 4.45च्या सुमारास काठी व फावड्याने मारूण गंभीर जखमी केले होते.

वृद्धास उपचाराकरीता वैद्यकिय महाविद्यालयात अतिदक्षता विभाग नागपुरला हलविण्यात आले, मात्र गंभीर जखमामुळे उपचारा दरम्यान त्यांचा  आज (दि. 11) 7.30 च्या दरम्यान मृत्यू झाला.बाबुराव नागोराव लोणारे हा वृद्धसोबत ओमप्रकाश तुकाराम लोणारे व कैलास तुकाराम लोणारे हे दोघे भांवडं जागेच्या वादावरून संगणमत करून 3 सप्टेंबरला सांयकाळी 4 .45च्या दरम्यान, हातात काठी व फावडे घेऊन आले व भांडण करून बाबुरावच्या उजव्या पायावर फावडयाने आणी काठीणे डोक्यावर मारूण गंभीर जखमी केले.सदर आरोपी विरोधात हत्या केल्याचे कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.