24 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home Top News गणपतीसमोरील घट विर्सजनासाठी गेलेल्या २ मुलांचा मृत्यू

गणपतीसमोरील घट विर्सजनासाठी गेलेल्या २ मुलांचा मृत्यू

0
24
सिंगोरी येथील ताराचंद कंगालेंच्या घरी गणपतीपुढे ठेवलेला घट विसर्जनाकरीता आज  सकाळी ११  वाजेच्या सुमारास कंगाले परिवार व गावातील काही मुले गावाशेजारील मामा तलावात गेले होते.घट विसर्जन झाल्यानंतर सर्वजण घराकडे यायला निघाले,मात्र वैभव आणि संकेत हे दोघे कुणालाही न सांगता तलावात पोहण्यासाठी गेले. त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. गावात परतल्यावर लोकांच्या लक्षात आले, की संकेत आणि वैभव आपल्या सोबत नाहीत. त्यामुळे परत तलावाच्या आजूबाजूला त्या दोघांचा शोध घेतला असता, तलावाशेजारी त्या दोघांचे कपडे आढळून आले. त्यावरुन ते दोघे तलावात बुडल्याची शंका गावकऱ्यांना येताच घटनेची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्या दोघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.
मृत वैभव ८ वीत शिकत होता तर संकेतचे यंदाचे १०वीचे वर्ष होते. दोघेही पवनी येथील विकास हायस्कूल मध्ये शिकत असल्याने दोघांमध्ये घनिष्ठ मित्रता होती. या दोघांच्या  मृत्यूमुळे दोन्ही परिवाराने आपल्या एकुलत्या एक मुलांना कायमचे गमावले आहे.
blank