बहुजन हिताय जगत कर्मचारी पतसंस्थेची आमसभा उत्साहात

0
41

सडक अर्जुनी,दि.24ः- बर्याच कर्मचारी पत संस्था कर्ज वितरणासाठी को.ऑप.बॅके वर अवलंबुन असतात .परंतु बहुजन हिताय जगत कर्मचारी सह.पत संस्था खजरी/डोंगरगांव स्वः भांडवलावर कर्ज वितरणास सक्षम आहे .त्याचे संपुर्ण श्रेय पतसंसथेच्या सभासदांच्या सहकार्याला जाते .असे विचार शिक्षण महर्षी जगतराम रंहागडाले यांनी व्यक्त केले.ते ता.20संप्टेबंर 2018 ,गुरूवारी आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्य.विद्यालय खजरी/डों.येथे आयोजीत पत संस्थेच्या वार्षिक आमसभेत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते .
या प्रसंगी पत संस्था सल्लागार समीतिचे सचिव नारायनराव येळे,बी.एस.परीहार,एस.पी.बोरकर,पतसंस्था अध्यक्ष खुशाल कटरे,सचिव रविशंकर कटरे,उपाध्यक्ष डाॅ.एस.एच.भैरम, कोषाध्यक्ष पी.सी.रंहागडाले,सह सचिव पी.डी.मुंगमोडे,संचालक जी.एम.येळे,डी.एल.मेश्राम,विष्णु काचोडे, ए.आर.बिसेन, के.जे.बर्वे, कु.टी.एम.ढोणे.एस.आर.भोयर, आर.यु.गौतम ,मुख्याध्यापक वाय.एस.कापगते पर्यवेक्षक यु.सी.तागडे श्री भिवगडे उपस्थित होते.प्रास्ताविक पत संस्था अध्यक्ष प्राचार्य खुशाल कटरे यानी मांडले,वार्षिक अहवाल सल्लागार समीती सचिव एन.एन.येळे यांनी प्रस्तुत केली.कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार,सभासदांच्या गुणवंत पाल्याचा सत्कार,शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या सभासंदांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जी.टी.लंजे,प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी केले.कार्यक्रम यशस्विते साठी पत संस्था व्यवस्थापक उमराव मांढरे,लिपीक एस.एल.कवरे व खजरी येथील कर्यांमचार्नीयानी परीश्रम घेतले.