25.2 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home राजकीय नागपूर जिल्ह्यातील भाजप मंत्र्याच्या गावातच भाजपचा पराभव

नागपूर जिल्ह्यातील भाजप मंत्र्याच्या गावातच भाजपचा पराभव

0
23

नागपूर,दि.27 –  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या मुळ गावात आणि दत्तक घेतलेल्या गावातही भाजपचा पराभव झाला आहे.ना. गडकरींचे मुळ गाव धापेवाडा येथे काँग्रेस समर्थीत सरपंचपदाचे उमेदवार सुरेश डोंगरे विजयी झाले आहेत. याठिकाणी काँग्रेसचे 16 तर भाजपचा केवळ एक उमेदवार निवडून आला आहे.  तसेच गडकरींनी दत्तक घेतलेले गाव पाचगाव येथे काँग्रेस समर्थीत सरपंचपदाच्या उमेदवार उषा ठाकरे विजयी झाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेसचे 10 तर भाजपचा एक उमेदवारी विजयी झाला आहे.त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे गृहक्षेत्र असलेल्या कवठा-म्हसाळा(ता.कामठी) येथेही काँग्रेसने झेंडा फडकवला आहे.तर काटोल-नरखेड तालुक्यात माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात 84 पैकी 35 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले असून मतगणना अद्यापही सुरुच आहे.कोंढाळी ग्रामपंचायतही राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे.