25.2 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ डाॅ.किरसान लिखित पुस्तक अशोक गहलोतांना भेट

डाॅ.किरसान लिखित पुस्तक अशोक गहलोतांना भेट

0
23

आमगाव,दि.27(मेहश मेश्राम)ः-आ्रॅल इंडिया कॉंग्रेस कमेटीचे महासचिव व प्रभारी अशोक गहलोत यांना कॉंग्रेसने देशाच्या प्रगतीसाठी केलेले कार्य व भाजपच्या सत्ताकाळात जनतेसोबत झालेला विश्वासघात, दडपशाही व महागाईचे विवेचन करणारी स्वलिखित पुस्तिका “उलगुलान” गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे इच्छुक उमेद्वार डॉ. नामदेव किरसान यांनी भेट स्वरुपात दिली.गहलोत हे काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठक तयारीसाठी नागपूरात अाले असताना ही पुस्तक दिली.त्यावेळी गोंदिया जिल्हयाचे प्रभारी डॉ. बबनराव तायवाडे,अशोक चव्हाणांचे खाजगी सचिव रामक्रुष्ण अोझा व नागपुर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे उपस्थित होते