25.2 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home Featured News “झुंड’साठी अमिताभ बच्चन नागपुरात

“झुंड’साठी अमिताभ बच्चन नागपुरात

0
31

नागपूर,दि.27 – झोपडपट्टीतील अशिक्षित व गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून देणारे नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित “झुंड’ या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगला अखेर मुहूर्त मिळाला आहे. चित्रपटाचे शूटिंग येत्या नोव्हेंबरमध्ये नागपुरात होणार असून, शूटिंगसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांचा दीर्घ काळ नागपुरात मुक्‍काम असेल. “सैराट’फेम नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाची मुख्य भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग गेल्या ऑगस्टमध्येच सुरू होणार होते. मात्र, काही कारणास्तव शूटिंग लांबणीवर पडले. आता नोव्हेंबरमध्ये शूटिंगला प्रत्यक्षात सुरवात होत असल्याची माहिती आहे. शूटिंग मोहननगर येथील सेंट जॉन्स हायस्कूल, लोणारा आणि प्रा. बारसे यांच्या सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूलजवळील घरी होणार आहे.