25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसने दिले तहसिल कार्यालयासमोर धरणे

राष्ट्रवादी काँग्रेसने दिले तहसिल कार्यालयासमोर धरणे

0
40

अर्जुनी मोरगाव,दि.03ः- अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज 3 आॅक्टोबंरला तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन केंद्र व राज्यसरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.वाढलेली महागाई आणि सातत्याने वाढत असलेले पेट्रोल व डिझेलच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली तारांबळ केंद्रसरकारच्या फसवेगिरीचा व पोकळ घोषणांचा परिणाम असल्याची टिका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केली.यावेळी तहसिलदार धनंजय देशमुख यांना महागाईच्या विरोधातील निवेदन देण्यात आले.

या धरणे आंदोलनात गंगाधर परशुरामकर गट नेते जि.प.गोंदिया, किशोर तरोणे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, लोकपाल गहाणे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, बंडुभाऊ भेंडारकर उपाध्यक्ष, नामदेव डोंगरवार, योगेश नाकाडे तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, विकास रामटेके, शुशिला हलमारे तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,अर्जुनी मोर, रजनी गिरेपुंजे तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सड़क अर्जुनी, नाजुकबाई कुंभरे पं स सदस्य माधुरी पिंपळकर, चित्रलेखा मिश्रा उपाध्यक्ष,उर्मिला मेश्राम सरपंच, मंजु चंद्रिकापुरे, आर.के.जांभुळकर, हेमकृष्ण संग्रामे, निप्पल बरैय्या, त्र्यबंक झोडे, गोवर्धन ताराम,मनोहर शाहारे, यादोराव तरोणे, साईनाथ पाऊलझगडे, दिपक सोनवाणे सरपंच आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.