25 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home गुन्हेवार्ता कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या १० जणांना अटक

कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या १० जणांना अटक

0
29
चिचगड पोलीस ठाणेतर्गंत ककोडी टी पॉईंट येथे रात्री सापळा रचून कारवाई पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांच्या मार्गदर्शना करण्यात आली. या कारवाईत पकडण्यात आलेल्या ट्रकचे क्रमांक ‘टी एस ०७ युएफ ३१८२’ या ट्रकमध्ये २२ बैल व ट्रक क्रमांक ‘टी एस २ युफ ५१३३’ मध्ये २३ बैल,  असे एकूण ४५ बैल ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत होते.यावेळी पोलीस पथकाने चालक महंमद शेख (रा. मुस्तफानगर, जि. फलकनाय, तेलंगाना), मुन्ना रहेमान शेख (रा. गडचांदूर, जि. चंद्रपूर), हुसेन शेख (रा. बल्लारशा, जि. चंद्रपूर), दूसरा ट्रक चालक निजाम हमाद खान (रा. सजेहानगर, जि. रंगोरेड्डी  तेलंगाना), पीटू गायकवाड (रा. गंडचांदूर, चंद्रपूर), शैलेश किरपाल (रा. ककोडी, जि. गोंदिया), शेख मजरद (रा. बल्लारशाह, जि. चंद्रपूर), इमरान बाबुमिया (रा. हैदराबाद, तेलंगाना), बळी चव्हाण (रा. ककोडी, जि. गोंदिया), इमरान शेख (रा. गडचांदूर निर्दय, जि. चंद्रपूर) यांना अटक केली आहे.