बालाघाट: ग्रामीण पोलीस ठाणे (नवेगाव) अंतर्गत येणाऱ्या खुरसोडी गावात पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळणाऱ्या १४ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील १३ जुगार्यांचा समावेश आहे. पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावरून ३ कारसह एकूण ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.९ ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली होती की, खुरसोडी येथील ओमप्रकाश नागपुरे याच्या गोदामातील पत्र्याच्या शेडमध्ये काही जण मोठ्या प्रमाणावर जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकून १४ जणांना जुगार खेळताना ताब्यात घेतले.
जप्त केलेला मुद्देमाल: कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख ५० हजार २०० रुपये रोख, ताशचे पत्ते, २ लाख ५० हजार रुपये किमतीचे १४ अँड्रॉइड मोबाईल आणि तब्बल ३४ लाख रुपये किमतीच्या ३ चारचाकी गाड्या (क्रमांक MH 35 AW 6080, MH 35 AG 6697 आणि MH 35 AW 9183) असा एकूण ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींची नावे: या प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील चारगाव येथील ओमप्रकाश नागपुरे (४०), अर्जुनी येथील शिवकुमार खैरवार (४७), नागरा येथील नरेश नागरिकर (५४), कन्हारटोला येथील आदित्य तुरकर (२१), नागरा येथील भरत लिल्हारे (४६), पांढराबोडी येथील कमलेश नागपुरे (३६), मुरपार येथील मंगल मस्करे (४४), चारगाव येथील सुधीर रोडगे (३३), रणजीत बरेले (४८), विशाल मेंढे (३३), पंकज नागपुरे (३०), खेमेंद्र बिरनवार (३९), सावरीटोला येथील जगदीश प्रसाद तिवडे (४०) आणि बालाघाट जिल्ह्यातील खुरसोडी येथील ओमप्रकाश दशहरे (४५) यांच्याविरुद्ध नवेगाव (ग्रामीण) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई बालाघाटच्या पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नवेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी उपनिरीक्षक रमेश कुमार जाट आणि त्यांच्या पथकाने केली.





