28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ अर्जुनी मोरगावात महात्मा राजा रावण पूजन कार्यक्रम

अर्जुनी मोरगावात महात्मा राजा रावण पूजन कार्यक्रम

0
38

अर्जुनी/मोर.,दि.20ः-  येथील भगवान बिरसा मुंडा स्मारक परिसरात महात्मा राजा रावण पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महात्मा राजा रावण पूजेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मीकांत मडावी होते.प्रमुख पाहुणे म्हणून सुनिता हुमे,नलिनी कोकोडे ,शीलाबाई उईके,विनोद दिहारी , मुरारीजी पंधरे,.के.जी . जुगनाके, भिमराव रामटेके,दाजी सलामे प्रामुख्याने उपस्थित होते.पाहुण्यांच्या हस्ते महात्मा राजा रावण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुनिता हुमे व भिमराव रामटेके या मान्यवरांनी राजा रावण यांचा इतिहास समजावून सांगितले. तसेच आदिवासी समाज बांधवांना समाज जागृतीपर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला बहुसंख्य आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.विशेष करुन राजा रावण पुजणाच्या कार्यक्रमाला आदिवासी वसतिगृहातील गृहपाल हसन मळकाम यांनी वस्तीगृहातील मुलांना आवर्जुन कार्यक्रमाला आणले.  यशस्वीतेसाठी यशवंत कुंभरे,रेवानंद उईके,खुशाल कोडापे,मोहन नाईक,परमेश्वर उईके,धनंजय मडावी,मुकेश मडावी,दिपक राऊत,परसराम पंधरे,कोकीळा मडावी,उषाबाईधुर्वे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नेतराम मलगाम सर यांनी केले.