28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता बोलेरो वाहनाच्या धडकेत बालिका ठार

बोलेरो वाहनाच्या धडकेत बालिका ठार

0
25

सिरोंचा,दि.२०: भरधाव जाणाऱ्या बोलेरो वाहनाने धडक दिल्याने १३ वर्षीय बालिका ठार झाल्याची घटना आज संध्याकाळी अडीच वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे घडली. राजेश्वरी बापू कोडारी रा.ग्लासफोर्डपेठा असे मृत मुलीचे नाव आहे.बोलेरो वाहन आलापल्लीकडून सिरोंचाकडे जात होते. यावेळी अचानक राजेश्वर कोडारी ही मुलगी वाहनासमोर आली. त्यामुळे वाहनचालकाचे संतुलन बिघडले आणि राजेश्वरी वाहनाखाली चिरडली गेली. घटनेची माहिती मिळताच बामणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे.