गोंदिया,,दि.३१: आपला समाज हा धार्मिकप्रवृत्तीचा समाज असला तरी कुठल्या पुस्तकाचे वाचन करायचे याची सुध्दा जाणिव असणे आवश्यक आहे.आजच्या घडीला आम्ही जरी तुलसीदासाने लिहिलेली रामायण वाचत असलो तरी त्यापेक्षा वाल्मिकीने लिहिलेल्या रामायणाचे वाचन समाजाने केले पाहिजे.त्यातच आपण सर्वकाही आपल्या नशिबावर अवलंबून असल्याचे गृहीत धरुन त्यापध्दतीने काम करतो,यासाठी आपली वैचारिक पातळी आणि विचार करण्याच्या क्षमतेत बदल होणे गरजेचे आहे.नशिबाने काहीही मिळत नसून जे मिळवायचे आहे,त्यासाठी श्रम करणार नाही तोपर्यंत काहीही होऊ शकणार नाही.याकरीता आपण सर्वांनी नशिबावर अवंलबून न राहता त्यावर मात करण्यासाठी विचार करण्याची क्षमता निर्माण करा असे विचार सेवानिवृत्त जिल्हा निबंधक लखनqसह कटरे यांनी व्यक्त केले.ते पवार प्रगतीशील मंच गोंदियाच्यावतीने पवार सांस्कृतीक भवन कन्हारटोली येथे आयोजित (दि.२७)शरद पोर्णिमा महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी पवार प्रगतीशील मंचचे माजी अध्यक्ष ललीत रहांगडाले होते. मंचावर स्वागताध्यक्ष म्हणून पवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष डॉ. कैलाशचंद्र हरिणखेडे,प्रमुख अतिथी म्हणून युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे, शिक्षक अजय रहांगडाले, विस्तार अधिकारी विनोद चौधरी, सेल टॅक्स कॉलनीचे एफ.सी. पटले, प्रदीप ठाकरे पाहुणे म्हणून उपस्थित होते.सोबतच सत्कारमुर्ती राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मनोज रहांगडाले, राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे, जनसंवाद सचिव डॉ. प्रा. संजीव रहांगडाले, सदस्य अॅड. रुपेंद्र कटरे व डॉ. प्रिती देशमुख,महिला पवार मंचच्या अध्यक्षा अंजली ठाकूर,प्रगतीशील शिक्षण संस्थेचे सचिव किशोर भगत,नवयुवक समितीचे अध्यक्ष राहुल बिसेन उपस्थित होते.
यावेळी श्री कटरे बोलतांना पुढे म्हणाले की आपल्याच समाजातील युवकाने शेतकèयांवरील जी व्यथा कवितेच्या माध्यमातून मांडली आहे,ते वास्तव्य चित्रण आहे.आपला समाज शेतीशी निगडीत आहे,परंतु देशाची पहिली लोकसभा अस्तित्वात येण्याआधीच तत्कालीन काळजीवाहू प्रधानमंत्रीने राज्यघटनेच्या कलम ३२ मध्ये शेतकèयांना न्याय अधिकारी मागण्यांचा अधिकारच हिरावून घेतला.जेव्हा की गोष्टीचा त्यावेळचे कायदामंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या प्रस्तावाचा विरोध केला तरीही त्यावेळच्या प्रधानमंत्र्यानी शेतकरी विरोधी भूमिका घेतली होती,तीच स्थिती आजही कायम असून शेतकरी हितासाठी आपल्याला त्या कलम ३२ मधील शेतकरी अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्याची गरज आहे.सोबतच आपल्या मुलाबाळामध्ये कुठल्या अभ्यासक्रमाची क्षमता आहे,याची निवड करुन त्यांना विविध क्षेत्रात पाठविण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन केले. यावेळी स्वागताध्यक्ष हरिणखेडे यांनी पवार प्रगतीशील मंचच्या कार्याचा आढावा सादर करीत समाजातील मुलासांठी दोन तीन महिन्यात वस्तीगृह सुरु करण्यात येत असल्याचे सांगितले.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ललीत रहागंडाले यांनी समाजबांधवाना संघटित होण्याचे आवाहन केले.यावेळी सत्कारमुर्ती तसेच विविध स्पर्धेतील विजेते आणि गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार स्व. देवूभाऊ तुरकर, स्व.बी.एम.पटेल, स्व. रामचंद्र हरिणखेडे, स्व. मुन्नालाल चव्हाण व स्व. देवेंद्रभाऊ बिसेन स्मृती पुरस्कार देऊन करण्यात आला.संचालन सचिव प्रा.संजीव रहागंडाले यांनी केले.आभार गौरव तुरकर यांनी मानले.आयोजनासाठी पवार प्रगतीशील मंच, पवार नवयुवक समिती, पवार महिला समितीने सहकार्य केले.




