24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ ना. बडोले यांनी स्वयंपाकीन महिलांच्या धरणे आंदोलनाला दिली भेट

ना. बडोले यांनी स्वयंपाकीन महिलांच्या धरणे आंदोलनाला दिली भेट

0
34

गोंदिया,दि.04ः-गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेल्या अंगणवाडी स्वयंपाकीन महिला कर्मचार्‍यांचे मानधन वाढीसाठीच्या जिप कार्यालयासमोरील धरणे आंदोलनाला पालकमंत्री राजकुमार बडोले,गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी ३ नोव्हेंबर रोजी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी स्वयंपाकीन कर्मचार्‍यांचे मागण्यासंदर्भात निवेदन स्विकारुन संबंधित अधिकार्‍यांसोबत बैठक लावण्याचे आश्‍वासन दिले. दिवाळीच्या सणासमोर धरणे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती सुध्दा त्यांनी केली.त्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.विशेष म्हणजे या आंदोलनाला युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी पाठिंबा जाहिर केला होता,ते सुध्दा यावेळी हजर होते.

blank