25.5 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात इसम जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात इसम जखमी

0
41

चंद्रपूर ,दि. १२ :- : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे सोमवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात सदाशिवक चिंचोलकर (५०) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या गावातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे संतप्त गावकक्तयांनी सरपंचांच्या नेतृत्वात वनविभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. मात्र दहा मिनिटांनी मध्यस्थी केल्यानंतर ते उघडण्यात आले.या बिबट्याने ९ नोव्हेंबर रोजी बालाजी मडावी (४५), ११ रोजी सकाळी प्रकाश वाढई तर १२ रोजी सदाशिव चिंचोळकर यांच्यावर हल्ला चढवला आहे. चिंचोळकर यांना कोठारी येथील प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी १५ कॅमेरे व दोन पिंजरे लावण्यात आले असून, त्याच्या शोधार्थ ५० कर्मचारी फिरत आहेत.