31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ अर्जुनी मोरगाव, गोंदिया,बालाघाट येथील दूरदर्शन रिले केंद्राचे प्रसारण होणार बंद

अर्जुनी मोरगाव, गोंदिया,बालाघाट येथील दूरदर्शन रिले केंद्राचे प्रसारण होणार बंद

0
14

गोंदिया,दि.14: अ‍ॅनालॉग टेरिस्ट्रीअल टी. व्ही. ट्रान्समिशनच्या डीडी नॅशनल चॅनेल व प्रादेशिक वाहिनीच्या अंतर्गत बालाघाट, अर्जुनी मोरगाव (चॅनेल-०६) रिले केंद्राचे प्रसारण १६ व गोंदिया (चॅनेल-०६) या दूरदर्शन रिले केंद्रांचे प्रसारण १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून बंद होणार आहे.संबंधित केंद्राची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार नाही. दूरदर्शन डीडी फ्री डिश, डी.टी.एच (डिरेक्ट टू होम) सेवा यावर सदर चॅनेल इतरही चॅनेल्ससोबत उपलब्ध आहेत. यासाठी आवश्यक असलेली उपकरणे उदा. सेट टॉप बॉक्स, डिश ॲन्टीना आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जवळच्या दूरदर्शन कार्यालय किंवा दूरदर्शनच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन दूरदर्शन अनुरक्षण केंद्र, नागपूरच्या अभियांत्रिकी विभागातर्फे करण्यात आले आहे..