28.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home गुन्हेवार्ता भाजपा आ.तोडसामच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

भाजपा आ.तोडसामच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

0
28

यवतमाळ,दि.14 : जिल्ह्यातील आर्णी येथील भारतीय जनता पार्टीेचा कार्यकर्ता निलेश मस्के याच्यावर आर्णी ग्रामीण रुग्णालयासमोर आज शुक्रवारला दुपारी १.३० वाजेच्या सुमारास लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. त्यांची प्रकृती चिंताजनक  असून निलेश हा केळापूर-आर्णीचे भाजपा आमदार प्रा. राजू तोडसाम यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता होता. हल्लेखोर संजय देठे हा तालुक्यातील म्हसोलाचा रहिवासी आहे. बुलेटवरून आलेला हल्लेखोर संजय हल्ल्यानंतर बुलेट जागीच टाकून पसार झाला. या घटनेने आर्णी येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

blank