33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News नागपुरात न्यायालय परिसरात वकिलाच्या हत्येचा प्रयत्न

नागपुरात न्यायालय परिसरात वकिलाच्या हत्येचा प्रयत्न

0
28

blank

नागपुर,दि.21 – येथील न्यायालय समोरील फायर अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आज शुक्रवारला सायकांळी 4 ते 4.45 वाजेच्या सुमारास कुर्हा़डीने गळ्यावर हल्ला करुन वकील सदानंद नारनवरे(वय 62) यांना ठार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली.वकीलावर हल्ला केल्यानंतर सदर आरोपीने घटनास्थळावरच विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला.अड. नारनवरे यांच्यावर हल्ला करणारा लोकेश भास्कर हा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. नारनवरे हे नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागाचे निवृत्त प्राध्यापक होते. भास्कर याने नुकतीच वकीलीची सनद मिळविली होती.तो नागपूरात प्रक्टीस करीता नेहमी जायचा आहे.

blank