39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता दांडेगावच्या सरपंच व उपसरपंचात हाणामारी

दांडेगावच्या सरपंच व उपसरपंचात हाणामारी

0
29

blank

गोंदिया,दि.01ः- तालुक्यातील दांडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच या नियमबाह्य काम करुन शासकीय निधीची लूट करीत असल्याची तक्रार करुन त्यांना पदावरुन दूर करण्याची मागणी करणारे उपसरपंच हिरामण बावणकर यांच्यावर आज सरपंच श्रीमती चौरे यांनी हल्ला करुन मारहाण केल्याची घटना घडली.दरम्यान सरपंचांनी मारहाण केल्यानंतर उपसरपंचानीही मारहाण केल्याचे बोलले जात असून उपसरपंच बावनकर यांच्या डोक्याला,चेहर्याला जबर मार लागलेला आहे.तर सरपंचाना ओढताण करण्यात आल्याचे वृत्त आहे.

याप्रकरणी दोघांनीही गंगाझरी पोलीस ठाण्यात धाव घेत एकमेकाविरुध्द तक्रार नोंदविली आहे.गेल्या वर्षभरापासून उपसरपंचासह इतर ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच श्रीमती चौरे यांच्या कार्यप्रणालीचा विरोध करीत त्यांना पदावरून हटविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.त्या तक्रारीची सुनावणी होऊनही अद्यापही निकाल न दिल्याने उपसरपंच बावनकरांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यासंबधीचे वृत्त आज अनेक वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर सकाळी हा वाद झाला.दरम्यान गंगाझरी पोलीसांनी याप्रकरणी दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रकिया केली असून उपसरपंचाविरुध्द अट्रासिटी कायद्यांतर्गत सुध्दा कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.

blank