24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्जाचा आढावा घेण्याकरीता आज सभा

शिष्यवृत्ती अर्जाचा आढावा घेण्याकरीता आज सभा

0
28

गोंदिया दि.३.: शैक्षणिक सत्र २०१८-१९ पासून महा-डिबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांनी २ जानेवारी २०१९ पर्यंत २४५३० एवढे अर्ज ऑनलाईन भरलेले असून त्यापैकी महाविद्यालयाने फक्त ७७५७ शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन मंजूर केलेले आहे. अद्यापपर्यंत महाविद्यालय स्तरावर १६७७३ एवढे अर्ज प्रलंबीत आहे. संबंधित महाविद्यालय स्तरावर प्रलंबीत असलेल्या शिष्यवृत्ती अर्जाचा आढावा घेण्याकरीता जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली ४ जानेवारी रोजी सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे दुपारी ३.३० वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सदर सभेला प्राचार्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, प्रतिनिधी पाठवू नये. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांनी कळविले आहे.