सांगली- अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतून महाराष्ट्र सावरला नसतानाच ज्येष्ठ समाजसेवक डॉ. भरत पाटणकर यांना धमक्यांची अनेक पत्रे मिळाले आहेत. विद्रोही संमेलनाचे अध्यक्षपद का स्वीकारले, असा सवाल या पत्रांमध्ये विचारण्यात आला आहे. पानसरे यांच्या हत्येपूर्वी त्यांनाही अशी निनावी पत्रे आली होती. त्याचा पोलिस तपास करीत आहेत.धरणग्रस्तांसाठी चळवळ करता, पवन चक्क्यांसाठी आंदोलन करता, पाण्याचा विषय लावून धरता हे योग्य आहे. पण मुस्लिमांचा अनुनय का करता, असे या पत्रांमध्ये विचारण्यात आले आहे. डॉ. पाटणकरांनी यासंदर्भात पोलिस तक्रार दाखल केलेली नाही. पण सोमवारी त्यांच्या पत्त्यावर सनातन प्रभातचा अंकही पाठविण्यात आला आहे. या कृत्यामागे कोण असेल असा प्रश्न विचारला जात आहे.