30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ ग्रामसेवक संघटनेच्यावतीने डेप्युटी सीईओ भांडारकरांचे स्वागत

ग्रामसेवक संघटनेच्यावतीने डेप्युटी सीईओ भांडारकरांचे स्वागत

0
26

गोंदिया,दि.१९ः- गोंदिया जिल्हा ग्रामसेवक संघटनेतर्फे  जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात नव्याने  रुजू झालेले उप मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत करण्यात आले. भांडारकर यांचे संघटना अध्यक्ष कमलेश बिसेन व पदाधिकारी यांनी स्वागत केले. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. भांडारकर यांनी सर्व जिल्हा परिषद कर्मचारी यांचे बाबतीत सकारात्मक निर्णय घेवून येणार्‍या सर्व नागरिकांचे कामे विनाविलंब करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे सांगितले.
यावेळी कमलेश बिसेन जिल्हा अध्यक्ष तथा विभागीय सचिव, दयानंद फटिंग जिल्हा सचिव, लक्ष्मण ठाकरे कोषाध्यक्ष, रामा जमाईवर, ओके रहांगडाले, व ईतर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.