30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ सार्वजनिक जयंती उत्सव समितीची सभा २६ रोजी

सार्वजनिक जयंती उत्सव समितीची सभा २६ रोजी

0
27
गोंदिया दि.२२ः: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याकरिता आणि महापुरुषांचे विचार जनमाणसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी जयंती उत्सव घेण्यात येते. २०१९ मध्ये सार्वजनिक जयंती उत्सव साजरा करण्याकरिता नियोजन सभेचे आयोजन ज्योतिप्रकाश गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता शुभमंगल कार्यालय येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मागील वर्षीच्या कार्यक्रमाचा आर्थिक अहवाल सादर करणे आणि नवीन कार्यकारिणीचे गठण करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.