24.5 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Top News सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू

सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू

0
29

पाटणा(वृत्तसंस्था)दि.03 – बिहारमधील सहदेई बुजुर्ग येथे मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे.  जोगबनी-आनंद विहार टर्मिनल सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरुन घसरले आहेत. यामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रेल्वे दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे 3.58 वाजेच्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.  ही एक्स्प्रेस जोगबनीहून दिल्लीच्या दिशेने प्रवास करत होती. या भीषण दुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. घटनास्थळावर सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.  एनडीआरएफची टीम आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळाला मोठा तडा गेला आहे.

blank