
चंद्रपूर,दि.०३ः-भारतीय सविंधानाने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा वापर करीत समाजातील युवकांना प्रशासनिक सेवेमध्ये अधिकाधिक संधी उपलब्ध होण्यासोबतच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी ओबीसीच्या लढ्यामध्ये पोवार समाजाने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे यांनी केले.ते क्षत्रिय राजाभोज पवार समाज बहुउद्देशिय संस्था चंद्रपूरच्यावतीने गायत्री मंदिर परिसराता २७ जानेवारीला आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व हळदी कूंकु कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून एक्सीस बँकेचे व्यवस्थापक संदिप चव्हाण,प्राचार्य रामप्रसाद हरिणखेडे,गुरुदेव सेवा मंडळ घुघुसचे अध्यक्ष प्रेमलाल पारधी,शैलेंद्र बिसेन,बापुजी ठाकरे,डॉ.सदानंद बिसेन,धनलाल पटले,सहसराम बिसेन,चंद्रचुड टेंभरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
ते पुढे बोलतांना आपला समाज आजही ग्रामीण भागात मोठया संख्येने वास्तव्यास असून आपण नोकरीच्या निमित्ताने बाहेर येऊन आपल्या बोलीभाषेसोबतच सामाजिक दायित्वाकडे केलेले दुर्लक्षामुळेच आज आपण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेल्या संविधानिक अधिकारापासून वंचित राहिलो आहे.तर बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदूकोडबिल मुळेच आज आपल्या समाजातील महिलांना शिक्षण,संपत्तीसह सर्वच क्षेत्रात समान अधिकार मिळाले आहेत.परंतु या गोष्टीची जाणिव आपणाला कुणीही न करुन दिल्याने आणि आपल्या इतिहासाकडे लक्ष न दिल्याने आजचा युवक या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे.तेव्हा आपण सर्वांनी आपल्या मूलभुत अधिकाराची जाणिव करण्यासाठी ओबीसीच्या लढ्यात सहभागी होऊन पोवार समाजाला सशक्त करण्यात सहकार्य करावे असे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री रहागंडाले यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबंधु भगिनी उपस्थित होते.आयोजनासाठी उदेलाल पारधी,संतोष बोपचे,लक्ष्मण कटरे,महेश गौतम,उमेश चौधरी,अरुण रहागंडाले यांच्यासह क्षत्रिय राजाभोज पवार बहुउद्देशिय संस्थेच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.





