25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ कर्जबाजारीपणामुळे युवा शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे युवा शेतकर्‍याची आत्महत्या

0
26

देसाईगंज,दि. १0ःःसततची नापिकी व कर्जबाजारिपणाला कंटाळून एका युवा शेतकर्‍यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज देसाईगंज येथील शेतशिवारात घडली. चेतन चिंतामण तलमले (३५) रा. नैनपुर वॉर्ड असे मृतक युवा शेतकर्‍याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार देसाईगंज येथील नैनपुर वॉर्डातील रहिवासी चेतन चिंतामण तलमले हा युवा शेतकरी आपली परिवाराची जबाबदारी सांभाळत होता, वडिलोपाजिर्त अडीच एकर कोरडवाहु शेती असल्याने पावसाच्या पाण्यावरच शेतीचे पिक निर्भर रहायचे. मागील तीन वर्षापासून पावसाचा लहरिपणामुळे धानपिक सतत बाधित होत गेले, चेतन हा सबंधित असलेल्या व्यक्ती कर्ज घेऊन शेती करायचा. पत्नी स्वाती (३0)व मुलगा स्वागत (३) असा लहानसा परिवार असून मुलगा स्वागत नेहमी बिमार राहायचा. गेल्या ३ वर्षापासून पीक संकटात आल्याने चेतनचा धीर खचला, गेल्या ४ दिवसापासुन तो चिंताग्रस्त होता,आज ९ फेब्रुवारीला सकाळी घरचे सर्व कामे आटोपुण बैलांना चारा घातला, पत्नीला व लहान मुलाला शेतावर जावुन येतो असे सांगितले. शेतात गेल्यानंतर चेतनने शेतातीलच मोहाच्या झाडाला गळफास घेवुन सकाळी १0 च्या सुमारास आपली जीवनयात्री संपविली.