35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ वाघाने केली गोठ्यातील बैलाची शिकार

वाघाने केली गोठ्यातील बैलाची शिकार

0
68

अर्जूनी/मोरगाव,दि.24ः- तालुक्यात गेल्या काही दिवसापासून वाघांच्या दहशतीखाली जनता वावरत असून २३ फेब्रुवारीच्या रात्री सोमलपूर गावात वाघाने बैलाची शिकार केल्याच्या घटनेने सोमलपूरवासी भयभीत झाले आहेत.
गोंदिया-भंडारा जिल्हा सीमेलगत सोमलपूर हे गाव जंगलाला लागून आहे.२३ फेब्रुवारीला रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास अल्पभूधारक शेतकरी झिंगर दुधराम दिघोरे यांच्या घराच्या छपरात बैल बांधलेले असता तेथे वाघाने प्रवेश केला वाघाची चाहूल लागताच जिवाच्या आकांताने दावा तोडून धुम ठोकली. मात्र घरापासून शंभर मीटर अंतरावर वाघाने बैलाला पकडून नरडीच्या रक्ताचा घोट पिला असावा नंतर वाघाने शेपटीकडील भाग फस्त केला. सदर घटना झुडपी जंगल टिसीएम नालीपासून दहा मीटर अंतरावर घडली. घटनेची माहिती नवेगावबांध वनविभागाला मिळताच आज 24 फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजे क्षेत्र सहाय्यक एच.एस. शेंडे आपल्या चमूहस घटना स्थळी पोचून पंचनामा केला.अल्प भूधारक शेतकरी झिंगर दिघोरे याचा बैल मारला गेल्याने त्यांचेवर संकट कोसळले बैल २५ ते ३० हजार रुपये किंमतीचा होता. नुकसानीची भरपाई देऊन वाघाच्या बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे

blank