डु्कराचे मांस शिजवितांना एकास अटक

0
27

साकोली,दि.24ःः- साकोली वनपरिक्षेत्रातील खंडाळा येथे एका घरी रानटी डुकराचे मांस शिजत असल्याची गोपनिय माहिती मिळताच वनाधिकारी व कर्मचार्यांनी खंडाळा येथील तेजराम सतीमेश्राम यांचे घरावर धाड टाकली. घराची झडती घेतली असता अंदाजे ३ किलो रानडु्नकराचे मटन चुलीवर शिजत असल्याचे आणि बाजुला ७ किलो भाजलेले मटन दिसून आले. प्रकरणी तेजराम सतीमेश्राम यास अटक केली असून त्यांच्याकडून मांस कापण्याचे साहित्य ताब्यात घेण्यात आले.

वनपरिक्षेत्राधिकारी आरती उके यांना भ्रमणध्वनीद्वारे खंडाळा येथे तेजराम सतीमेश्राम यांचे घरी रानडु्नकराचे मांस शिजत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधार वनविभागाच्या वतीने सापळा रचण्यात आला. वनपरिक्षेत्राधिकारी आरती उके यांच्या मार्गदर्शनात सानगडीचे क्षेत्रसहाय्यक ए.बी. मेश्राम, वनरक्षक सी. डब्लू. सार्वे वनकर्मचारी यांनी सतीमेश्राम याचे घरावर धाड टाकली. तेजराम सतीमेश्राम यास ताब्यात घेत पंचनामा केला. तसेच घटनास्थळावरून शिजलेले व भाजलेले मटन, मटन कापण्याचे साहित्य, तराजू व वजन ताब्यात घेतले. आरोपी व घटनास्थळावरून मिळालेल्या साहित्यांना सानगडी येथील वनकार्यालयात आणण्यात आले.

वनविभागाने तेजराम सतिमेश्राम यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करीत त्याला साकोली येथील न्यायालयात हजर केले. सतीमेश्रामने रानटी डु्नकराला कुत्र्यांनी मारले, असे सांगितले असले तरी रानडु्नकराची शिकार करण्यात आली. तसेच या प्रकरणात आणखी काही व्यक्ती सहभागी असल्याचे संशय वनविभागाला असल्याने कसून तपास करण्यात येत आहे. सदर कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी आरती उके यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक ए.बी. मेश्राम, एस. आर. साखरे, वनरक्षक पी.बी ढाले, सी.डब्लू. सार्वे, रिना देशमुख, लेकीराम कापगते, भारत शहारे, वाहन चालक शेंडे व वनमजूर यांनी केली.