33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ आलापल्ली बस स्थानकाच्या प्रस्तावित जागेची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

आलापल्ली बस स्थानकाच्या प्रस्तावित जागेची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

0
22

blank

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.25ः- जिल्ह्यातील आलापल्ली हे ठिकाण महत्वाचे स्थळ असून गेल्या अनेक वर्षापासून याठिकाणी बसस्थानकाची मागणी करण्यात येत होती.आत त्या मागणीला न्याय मिळण्याचे दिवस आले असून अत्याधुनिक सुविधा असलेल्या बस स्थानक बांधकामाला मंजुरी मिळाली आहे.त्यासाठी शासनाने २.२० कोटी रुपयांची निधी मंजूर केला असून लवकरच भूमिपूजन कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राजे आम्ब्रिशराव आत्राम यांनी बस स्थानकाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करतेवेळी दिली.
आलापल्ली हे गाव अहेरी विधानसभा क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे.येतूनच पाचही तालुका मुख्यालयाला रस्ते जात असल्याने नेहमीच लोकांची गर्दी असते. परंतु सुसज्ज बस स्थानक नसल्याने लोकांना रस्तावर उभे राहावे लागत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असे.त्यामुळे आलापल्ली येते सर्वंसोईयुक्त बस स्थानक व्हावे अशी गेल्या २५ वर्षांपासून मागणी होती.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजे आम्ब्रिशराव आत्राम यांनी आमदार म्हणून निवडून आल्यास आपण आलापल्ली येथे सुसज्ज बस स्थानक मंजूर करून देऊ असा शब्द जनतेला दिला होता.गेल्या ४ वर्षात पालकमंत्री राजे आम्ब्रिशराव आत्राम यांनी सातत्याने आलापल्ली येथील नवीन बस स्थानकासाठी पाठपुरावा करून जागेचा प्रश्न सोडवून २.२० कोटीचा उपलब्ध करुन दिल्याने बसस्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जागेची पाहणी करतेवेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती मधुरीताई उरेते, अहेरीच्या नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे,भाजपा अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार,भाजपा आलापल्ली शहराध्यक्ष नागेश रेड्डी, अहेरी शहराध्यक्ष मुकेश नामेवार, सागर डेकाटे, फिरोज शेख,गुड्डू ठाकरे, विनोद ठाकरे, सचिन करमे सह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

blank